Family Quotes In Marathi ह्या आपल्या नवीन पोस्ट मध्ये आम्ही कुटुंबावरील काही सुंदर विचार मांडलेले आहेत जे प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटूंबाबद्दल वाटतात प्रत्येक माणसाला आपले कुटुंब हे सर्वांत बेस्ट वाटत असते हे दर्शवण्यासाठीच आम्ही ह्या पोस्ट मध्ये Sweet Family Quotes In Marathi सुद्धा लिहलेले आहेत कुटुंब हे देवाने माणसाला दिलेले एक वरदान आहे आपण ज्यांच्या सोबत राहतो ते आपल्यावर खूप प्रेम करतात आणि आपण सुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकतो तरी मला आशा आहे कि आपल्याला हा Family Status जरूर आवडतील आणि हे Quotes तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर नक्कीच शेयर करा
सगळी दुनिया तुमच्याशी स्वतःच्या मतलबासाठी जोडलेली असली तरी तुमचे कुटुंब नेहमी कोणत्याही संकटात तुमच्यासोबत निस्वार्थपणे साथ देते
जेव्हा जीवनरुपी महासागरात आशेची नौका बुडत असते तेव्हा कुटूंबरूपी लाकडाचा ओंडका आधारासाठी तुमच्या आसपासच पोहत असतो
आपले कुटुंब हे प्रेमाच्या धाग्यांनी गुंफलेले आपले एक छोटेसे घरटे असते
कुटुंबापेक्षा प्रिय कोणतेही अमोल धन नाही वडिलधाऱ्यांपेक्षा मोठेकोणी सल्लागार नाहीत आणि आईपेक्षा कोणतीही मोठी मायेची सावली या जगात नाही.
आपले नाते हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधीही नसावे कारण समुद्राच्या लाटा ह्या एक दोन मिनिट आनंद देऊन पुन्हा निघून जातात
कुटुंब हे एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून आपल्याला शांततेचा आनंदाचा आणि सुरक्षित असल्याचा अनुभव घेता येतो.
आपलं कुटुंब हीच प्रत्येक व्यक्तीची खरी ताकत असते
या जगात तुम्हाला रडवणार खूप भेटीला पण तुमचं दुःख पाहून रडणारे तुम्हाला आधार देणारे फक्त तुमचे जवळचेच असतील
चूक माझी नसतानाही मी तुझी माफी मागायला तयार आहे कारण तुटणारे नाते जपायला मी माघार घ्यायला तयार आहे
पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो एक प्रेमाने मायेने आणि विश्वासाने बहरलेले कुटूंब कमवतो.
आपले नाते भक्कम बनवण्यासाठी एक सांगतो ,चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि वाईट गोष्टी विसरून जा .
या जगात आपली खरी ताकद आणि खरी ओळख आपले कुटुंब आहे,जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीशी लढण्याची,सामोरे जाण्याची शक्ती देतं.
आपल्या आयुष्याची सर्वात मोठी शिकवण देतं ते म्हणजे आपलं स्वतःच कुटुंबच होय.
कधी मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन आपल्या प्रेमळ कुटुंबासोबतही वेळ व्यतीत करा. खरं सुख व आनंद त्यात नक्कीच मिळेल.
कुटुंब ही मानव समाजातील एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
कुटुंबच तुम्हाला आयुष्यात यशाची शिखरे प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन आणि आधार दोन्ही देते
कोणताही विचार न करता अहंकार दाखवून आपली नाती तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जोडून ठेवण्यातच खरं यश आहे.
ज्याने आपल्या आजीच्या हातची चुलीवरच्या भाकरीची चव घेतली तो सर्वात नशीबवान व्यक्ती
आयुष्य सुंदर हे तेव्हाच होते जेव्हा आपले कुटुंब आपल्या सोबत असते
कुटुंबाचं प्रेम हा ह्या जगातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.
तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देवाने तुमच्यासाठी सर्वोत्तम नाती निवडतो
काही वेळा नात्यात प्रेम वाढवण्यासाठी कढूपणा आणावा लागतो नाहीतर साखरेसारख्या गोडीतील नाती नेहमीच प्रेमळ असतीलच असं नाही.
आपल्या कुटुंबाचं खरं महत्त्व हे कुटुंबापासून दूर गेल्यावरच कळून येते .
एका घरात सोबत राहणे म्हणजे कुटुंब होत नाही, एकत्रित हसत खेळत जगणं आणि सगळ्यांची काळजी करणं यालाच कुटुंब म्हणतात.
कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी माणसाला दिली देन आहे.
काही माणसं पिंपळाच्या झाडासारखी असतात कितीही मोठी झाली तरी आपल्याला आधार आणि सावली देण्याचं काम नेहमी करतात
कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे निस्वार्थ सहाय्यक आणि सल्लागार आहेत.
काही लोक पैशाला आपले कुटुंब समजून आयुष्यातील सर्वात मोती चूक करतात
आपल्या कुटुंबाला एकाद्या जिवलग मित्रांप्रमाणे माना आणि आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबाप्रमाणे माना, मग बघा आनंद आणि सुख आपोआपच तुमच्या आयुष्यात येईल.
कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी झालेले मतभेद किंवा नकळत झालेली भांडण काही मिनिटात संपतात पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष निघून जातात.
तुमच्या पुढच्या पिढीला देता येईल असं सगळ्यात चांगल गिफ्ट म्हणजे तुमचं एकत्र सुखी आनंदी कुटुंब.
जगातील कोणत्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही विकत मिळणार नाहीत, कारण ती तुमच्या कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.
तुम्ही जर मोगऱ्याच एक फुल असाल तर कुटुंब एक गजरा आहे जे त्याच्या सुगंधाने सर्वांचे आयुष्य प्रेमाने भरते
कुटुंब हे देवाने दिलेलं असं वरदान आहे, जे आयुष्यातील कोणत्याही संकटात तुम्हाला साथ देणारच
आपल्या जीवनातील इतर कोणत्याही गोष्टी बदलता येतात, पण आपली सुरूवात आणि आपला शेवट हा कुटुंबासोबतच होतो.
कुटुंब हे एका मोठ्या झाडासारखं असते जे कडक उन्हात आपल्याला सावली देतं असत
कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यात असणाऱ्या प्रेमावर आणि एकजुटीवर अवलंबून असतो.
नाती कधीही निर्माण केली जात नाहीत. नातीही नेहमी मनाने जोडली जातात आणि आयुष्यभर आपल्याला साथ देतात
संपूर्ण जगात कुटुंबच ही अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता आणि आनंद मिळतो .
जगातील सर्वात मोठा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.
कधीही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनात पडलेल्या अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळत सुद्धा नाही.
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आणि त्यांना विसरण्यात आहे कारण एकही चूक नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल
आपल्या आयुष्यातील आपण अनेक गोष्टी बदलतात पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात कुटुंब आणि आपली नाती कधीच बदलत नाही.
कोणतीही अगाध संपत्ती नको ना कोणती ओळख हवीयं एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की, माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असू दे
खूप नम्रता हवी वागण्यात नाती जपण्यासाठी , छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जात होते ह्या जगात नाही .
कुटुंबात प्रेम माया आणि ममता असते जिथे ,कशाचीही उणीव नसते तिथे ,दुःखाला अन संकटाना कधीही थारा नसतो तिथे
कुटुंब जपायचं असते भांड्याला भांड लागले तरी न भांडता एकजुटीने राहायचे असते
फॅमिली व्हाट्सअँप ग्रुप बनवला कि प्रत्येकक्ष भेटणं आणि बोलणं टळत पण टाकलेल्या स्टोरियस आणि फोटो वरून भांडणाला कारण मात्र नक्की मिळत
मातीच्या मडक्याची किंमत जसे कुंभारालाच माहिती असते आणि कुटुंबाची खरी किंमत ही फक्त त्याला जपून ठेवणाऱ्यालाच माहिती असते असते तोडण्याऱ्याला नाही.
आपल्या चांगल्या सवयी आपल्या कुटुंबाला जोडून ठेवतात आणि असे कुटुंब आपल्यावर चांगले संस्कार करू शकते
कितिही मतभेद असून सुद्धा जे एकत्र प्रेमाने आनंदाने राहतात ते म्हणजे कुटुंब
कागदाला एकत्र जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते, तसंच कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्याकरता त्रास हा होतोच
जर तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी भक्कम पने उभे असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणे खूप सोपे होऊन जाते
तुम्ही जगाच्या पाटीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला तुमच्या परिवाराची आठवण नक्की येईल
नाती जोपासणे ही अवघड एक कला आहे, जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकू शकेल
कुटुंब हे अशी जागा आहे जिथे जगण्याची उमेद आणि उंच भरारी घेण्यासाठी पंख मिळतात
घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवणं वेळ घालवणं यापेक्षा काहीही सुख देणारं असू शकत नाही.
आपले जन्मदाते असे गुरु आहेत जे आपल्याकडून आपल्या सुखाशिवाय आनंदाशिवाय काहीच मागत नाही
नाती ही एका फुलपाखरासारखी असतात घट्ट धरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातील आणि सोडून दिले तर ती ऊडुन जातील आणि नम्रपणे जपून ठेवलीत तर आयुष्यभर तुमची साथ देतील
दुसर्या शहरात गेल्यावर आनंदाचा खरा अर्थ समजत नाही पण आज आनंद काय असतो ते कुटुंबासोबत राहूनच समजले कि एक प्रेमळ, काळजी घेणारे, संकटात साथ देणारे कुटुंब मला भेटले
आपले कुटुंब हे जीवनात खूप काही शिकवते वाईटातून चांगले कसे मिळवावे आणि स्वतःला सर्वोत्कृष्ट कसे बनवावे हे शिकवते
नाते तोडणे हे खूप सोपे असते पण ते जपणे आणि टिकवणे हे खूप अवघड असते
मनातील भावनांनी जोडलेली नाती कधीच तुटत नाहीत, पण मतलबासाठी जोडलेल्या नात्यांना एकदिवस तडा नक्कीच जातो.
तुम्ही मदत न मागता जे प्रत्येक संकटात तुमच्या सोबत असतात तेच तुमचे कुटुंब असते
एक गैरसमज एका सुंदर प्रेमळ नात्याचा शेवट करू शकतो
एक नाते जपायला आयुष्य कमी पडत तर ते नाते तुटायला एक क्षण पुरेसा असतो
आपल्याला आमची Family Quotes In Marathi हे पोस्ट कशी वाटली ते कंमेंट द्वारे जरूर कळवा. आपणही एकमेकांचा परिवाराचाच भाग आहोत त्यामुळे तुम्ही ह्या quotes आपल्या सोसिअल मीडिया यावर शेयर करा आणि आपल्या परिवाराला Family Whatsapp Status त्यांच्या व्हत्सप्प वर पटवायला विसरू नका.
Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
Post a Comment