मराठी कोडी व उत्तरे

मराठी कोडी व उत्तरे | Riddles In Marathi With Answers | Marathi Puzzles

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मराठी कोडी {Marathi riddles} दिलेले आहेत.कोडे सोडवा {Puzzle in marathi} खेळल्याने आपला वेळ छान तर जातोच पण आपली मैत्री हि अजून घट्ट होते. ह्या इंटरनेटच्या युगात हा Marathi kodi with answer खेळ खूप कमी झाला आहे.आपले मित्र किती हुशार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्याना कोडी मराठी {Paheli in marathi} पाठवा आणि त्याची मजा घ्या.

ओळखा पाहू कोडी मराठी पाहण्यासाठी तुम्ही मराठी कोडे {Intelligent marathi puzzles with answers} किंवा Marathi kodi आपण मित्र मैत्रिणींना पाठवू शकतो.तर आशा आहे कि आपल्याला हे Marathi puzzles with answers for whatsapp किंवा Puzzle questions in marathi जरूर आवडले असतील.


Make Your Full Screen Orange Now 💻

    Riddles In Marathi With Answers
  1. सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
    ना असे काना नावात
    ना असे मात्रा नावात
    ना असे नी वेलांटी नावात
    नांव सांगा त्याचे ?

    उत्तर -अहमदनगर✔

  2. मुकुट माझ्या डोक्यावर आहे
    जांभळा झगा माझ्या अंगावर आहे
    आहेत मला काटे जरा सांभाळून
    चविष्ट आहे मी खातात मला भाजून
    सांगा पाहू मी आहे तरी कोण

    उत्तर- वांगे✔

  3. चार खंडाचा आहे एक शहर
    चार आड विना पाण्याचे
    18 चोर आहेत त्या शहरात
    एक राणी आणि एक शिपाई
    मारून सर्वांना त्या आडात टाकी
    ओळख पाहू मी कोण

    उत्तर -कॅरम✔

  4. कोकणातून आली माझी सखी
    तिच्या मानेवर दिली मी बुक्की
    तिच्या घरभर पसरल्या लेकी
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- लसुन✔

  5. चार बोटे आणि एक अंगठा
    तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
    सर्वजण बेजार म्हणतात मला
    तरी नेहमी उपयोगी मी राही
    सांगा पाहू मी कोण
    उत्तर- हातमोजे✔

  6. गोष्ट आहे मी अशी
    मला घेता तुम्ही खाण्यासाठी
    मात्र मला तुम्ही खात नाही
    सांगा पाहू मी कोण ?

    उत्तर -ताट✔

  7. दिवसा झोप काढुनी मी
    फिरतो बाहेर रात्रीला मी
    आहे असा प्रवासी मी
    पाठीला दिवा बांधून मी
    कोण आहे मी ?

    उत्तर -काजवा✔

  8. बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले
    तुला तहान लागली तर ती खा
    तुला भूक लागली तर ती खा
    तुला थंडी वाजली तर ती जाळ
    ओळखा पाहू ती वस्तू कोणती

    उत्तर-नारळ✔


  9. Marathi Puzzles
  10. पाच अक्षराचा एक पदार्थ
    पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव
    पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज
    पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर
    सांगा पाहू मी कोण?

    उत्तर - गुलाबजाम✔

  11. एका माणसाला बारा मुले
    काही छोटी काही मोठी
    काही तापट तर काही थंड
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- वर्ष✔

  12. भाऊराया माझा खूप शैतान
    बस तू माझ्या नाकावर
    पकडून माझे कान
    सांगा आहे तरी मी कोण

    उत्तर- चष्मा✔

  13. एका काळ्याकुट्ट राजाची
    अद्भुत मी राणी
    हळूहळू पिणार मी पाणी
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- दिवा✔

  14. कोकणातून आली एक नार
    आहे तिचा पदर हिरवागार
    आहे तिचा कंबरेला पोर
    सांगा मी आहे तरी कोण

    उत्तर- काजू✔

  15. अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता
    किंवा ती तुम्हाला गिळू शकते
    सांगा पाहू ती आहे कोणती

    उत्तर- अहंकार✔

  16. कोकणातून आलेला एक रंगू कोळी
    आणि त्याने एक भिंगु चोळी
    शिंपी म्हणतोय मी शिव तरी कशी
    धोबी म्हणतोय मी धुवू तरी कशी
    राणी म्हणते मी घालू तरी कशी
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- कागद✔

  17. एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला
    तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे

    उत्तर- तो पहिल्याच पायरीवर होता✔

  18. कोकणातून आला एक भट
    त्याला धर की आपट
    सांगा मी आहे तरी कोण

    उत्तर- नारळ✔

  19. हिरव्या घरात लपले एक लाल घर
    लाल घरात आहेत खूप लहान मुले
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- कलिंगड✔

  20. काळ्याभोर रानात एक हत्ती मेला
    लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला
    सांगा मी कोण

    उत्तर- कापूस✔

  21. तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात
    तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता
    तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण

    उत्तर- तुम्ही✔

  22. काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा
    निघालास कुठे शेंबड्या पोरा
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- फणस✔

  23. एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी
    नारळाच्या झाडावर जोराने धावत होते
    तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील

    उत्तर- नारळाच्या झाडावर केळी नसतात✔

  24. माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत
    तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही
    सांगा मी आहे कोण

    उत्तर- कीबोर्ड✔

  25. असे फळ कोणते
    त्याच्या पोटात दात असतात

    उत्तर- डाळिंब✔

  26. दोन अक्षरात सामावले माझे नाव
    मस्तक झाकणे आपले माझे काम
    ओळखा पाहू मी आहे कोण

    उत्तर- टोपी✔

  27. मी आहे तरी कोण
    तिच्या डोळ्यात बोटे टाकली की
    माझं तोंड उघडते

    उत्तर- कात्री✔

  28. कोणत्या महिन्यात
    लोक सर्वात कमी झोपतात

    उत्तर- फेब्रुवारी✔

  29. प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती
    जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही

    उत्तर- वय✔

  30. मराठी कोडी
  31. नाव एका माणसाचे चार अक्षरी
    पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव
    दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव
    तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव
    चारही अक्षर मिळून त्याचे नाव
    ओळखा पाहू ते नाव काय

    उत्तर- सिताराम✔

  32. दोन गुहेचे आहेत दोन रक्षक
    दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- मिशा✔


  33. थंडीतही वितळणारी गोष्ट मी
    सांगा तुम्ही माझे नाव काय

    उत्तर- मेणबत्ती✔

  34. पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते
    हात नसूनही मी तुमच्याशी भांडते
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- पतंग✔

  35. मी आहे वस्तू सोन्याची
    तरीही मला किंमत नाही सोन्याची
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- Bed✔

  36. तीन अक्षरांचे माझे नाव
    वाचा उलटे किंवा वाचा सरळ
    मी आहे प्रवासाचे साधन
    सांगा पाहू माझे नाव

    उत्तर- जहाज✔

  37. कोण आहे जो
    आपली सर्व कामे
    आपल्या नाकाने करतो

    उत्तर- हत्ती✔

  38. अशी कोणती गोष्ट आहे
    जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही

    उत्तर- दूध✔

  39. एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते
    परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते
    पहिल्या खोलीत भयानक आग असते
    दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत
    दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे

    उत्तर- तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही✔

  40. अशी कोणती गोष्ट आहे
    जी सर्वात हलके असते
    परंतु बलवान व्यक्ती तिला रोखू शकत नाही

    उत्तर- श्वास✔

  41. एकदा एक माणूस रस्त्याने जात होता
    अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली
    व संपूर्ण भिजून गेला
    तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही
    असे कसे झाले

    उत्तर- कारण तो माणूस टकला होता✔

  42. एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले
    तर ते कोणत्या बाजूला पडेल

    उत्तर -कोंबडी कधी अंडी देत नसतो✔

  43. अशी कोणती संपत्ती आहे
    जी वाटल्याने वाढते

    उत्तर- ज्ञान✔

  44. हजार येतात हजार जातात
    हजार बसतात पारावर
    हाका मारून जोरात
    हजार घेतात उरावर

    उत्तर- बस किंवा रेल्वे✔

  45. डोळा असून सुद्धा
    मी पाहू शकत नाही

    उत्तर- सुई✔

  46. लाल मी आहे पण तो रंग नाही
    कृष्ण मी आहे पण देव मी नाही
    आड आहे पण पाणी त्यात नाही
    वाणी आहे पण दुकान माझं नाही
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- लालकृष्ण आडवाणी✔

  47. आपण कोणत्या प्रकारचा टेबल खाऊ शकतो

    उत्तर- व्हेजिटेबल✔

  48. तुम्ही जेवढे याच्याजवळ जाल तो मोठा होत राहील

    उत्तर- डोंगर✔

  49. आठवड्याच्या सात वारांचे व्यतिरिक्त
    अजून तीन दिवसांची नावे सांगा

    उत्तर- काल आज उद्या✔

  50. लई धाकड हा
    तीन डोके आणि पाय दहा

    उत्तर- दोन बैल आणि एक शेतकरी✔

  51. प्रश्न असा की उत्तर काय

    उत्तर- दिशा✔

  52. हिरव्या पेटीत बंद मी
    काट्यात मी पडलेली
    उघडून पहा मला
    मी आहे मोत्याने भरलेली

    उत्तर -भेंडी ✔

  53. नसते मला कधी इंजीन
    नसते मला कसलेही इंधन
    आपले पाय चालवा भरभर
    तरच धावणार मी पटपट
    सांगा मी आहे तरी कोण ?

    उत्तर -सायकल✔

  54. नेहमीच असतो मी तुमच्या घरी
    तरी काहींनाच मी आवडतो
    एकावर एक कपडे मी घालतो
    तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
    सांगा पाहू मी आहे तरी कोण

    उत्तर -कांदा ✔

  55. मी नेहमी तिथेच असतो
    तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता
    रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर -सूर्य ✔

  56. उन्हाळ्यात माझ्या पासून दूर तुम्ही पळता
    हिवाळ्यात माझ्या जवळ तुम्ही येता
    माझ्यामुळेच आकाशात दिसतात तुम्हाला सात रंग
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर -ऊन ✔

  57. अशी कोणती गोष्ट आहे तुमची
    जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात

    उत्तर- नाव ✔

  58. छोटेसे कार्टे
    संपूर्ण घर राखते

    उत्तर -कुलूप✔

  59. आम्ही जुळे भाऊ शेजाशेजारी
    तरीही भेटत नाही जन्मोजन्मी

    उत्तर -डोळे✔

  60. एक शेतकऱ्याकडे होते दोन बैल
    एक मेला एक विकला
    आता त्याच्याकडे किती बैल राहिले ?

    उत्तर -एक किंवा शून्य✔

  61. प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे
    तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता
    परंतु उजव्या हाताने नाही
    सांगा पाहू मी आहे तरी कोण

    उत्तर-उजवा कोपरा✔

  62. marathi kodi with answer
  63. बारा जण आहेत जेवायला
    एक जण आहे वाढायला
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- घड्याळ✔

  64. मी सगळ्यांना उलटे करतो
    तरीही स्वःतला काहीच हलवू शकत नाही

    उत्तर -आरसा✔

  65. तो वेडा नाही तरीही कागद फाडतो
    तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो
    मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो
    सांगा पाहू मी कोण?

    उत्तर -वाहक {Conductor}✔

  66. एक कपिला गाय
    आहेत तिला लोंखडी पाय
    राजा बोंबलत जातो
    पण ती थांबत नाही

    उत्तर -रेल्वे✔


  67. मातीविना उगवला कापूस लाख मन
    पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- ढग✔

  68. बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही
    दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही
    श्वास घेते मी पण तुम्ही नाही
    ओळखा पाहू मी आहे तरी कोण

    उत्तर- बासरी✔

  69. संपूर्ण गावभर मी फिरते
    तरीही मंदिरात जायला मी घाबरते
    सांगा पाहू मी आहे तरी कोण

    उत्तर- चप्पल✔

  70. दात असून सुद्धा मीच आवडत नाही
    काळे शेतात गुंता झाल्यावर ती मी सोडती
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- कंगवा✔

  71. एक रूमाल वाढायला एक तास लागतो
    तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील

    उत्तर -एक✔

  72. एक लाल गाई
    नुसती लाकूड खाई
    जर पाणी पिले
    तर मरून ति जाई
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- आग✔

  73. पाय नाहीत मला
    चाके नाहीत मला
    तरी मी खूप चालतो
    काही खात नाही मी
    फक्त रंगीत पाणी पितो
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- पेन✔

  74. आम्ही दोघे जुळे भाऊ
    एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे
    सोबत असता खुप कामाचे
    एक हरविता नाही काम दुसऱ्याचे

    उत्तर- चप्पल✔

  75. मी कधीही आजारी पडत नाही
    तरीसुद्धा लोक मला गोळी देतात

    उत्तर- बंदूक✔

  76. काळे बीज आणि पांढरी आहे जमीन
    लावून ध्यान त्यात वहाल तुम्ही सज्ञान
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- पुस्तक✔

  77. सगळीकडे आहे उजेड आणि गाणी
    मी तर आहे सणांची राणी
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- दिवाळी✔

  78. दगड फोडता चांदी चकाकली
    चांदीच्या आडात मिळाले पाणी
    सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- नारळ✔

  79. जगाच्या खबरी साठवून ठेवतो
    खूप मोठे माझे पोट
    म्हणूनच तर प्रत्येक सकाळी
    आता सर्वजण माझी वाट

    उत्तर- वर्तमानपत्र✔

  80. रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
    घरे आहेत परंतु माणसे नाहीत
    जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- नकाशा✔

  81. पांढरे माझे पातेले
    त्यात ठेवला पिवळा भात
    ओळखेल मला जो कोणी
    त्याच्या कमरेत घाला लाथ

    उत्तर- उकडलेले अंडे✔

  82. अवतीभोवती आहे लाल रान
    32 पिंपळाना फक्त एकच पान
    सांग भाऊ मी कोण

    उत्तर- दात आणि जीभ✔

  83. लाईट गेली माझी आठवण झाली
    असो मी लहान किंवा मोठी
    माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी
    सांग मी आहे तरी कोण

    उत्तर- मेणबत्ती✔

  84. मी तिखट मीठ मसाला
    मला चार शिंगे कशाला
    सांगा पाहू मी आहे तरी कोण

    उत्तर- लवंग✔

  85. गळा आहे मला पण डोकं नाही मला
    खांदा आहे मला पण हात नाहीत मला
    सांगा भाऊ मी आहे कोण

    उत्तर- शर्ट✔

  86. एक सूप भरून लाह्या
    त्यात फक्त एक रुपया

    उत्तर- चंद्र आणि चांदण्या✔

  87. तीन पायांची एक तीपाले
    बसला त्यावर एक शिपाई
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- चूल आणि तवा✔

  88. intelligent marathi puzzles with answers
  89. गावचे पाटील तुम्हाला राम राम
    दाढीमिशी तुमची तांबूस खूप लांब लांब

    उत्तर- मक्याचे कणीस✔

  90. एक गोष्ट जी
    खायला कुणाला आवडत नाही
    पण सर्वांना मिळते

    उत्तर- धोका✔

  91. हिरवा आहे परंतु पाने नाही
    नक्कल करतो मी परंतु माकड नाही
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- पोपट✔

  92. प्रत्येकाकडे असते मी
    सगळे सोडून जातील
    पण मी कधीच सोडून जाणार नाही

    उत्तर- सावली✔

  93. वस्तू आहे मी अशी
    छिद्रे असतानाही असतानाही
    पाणी भरून मी घेते

    उत्तर- स्पंज✔

  94. मी नेहमी तुमच्या पुढे असतो
    तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- भविष्य✔

  95. एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी
    एक उतरवली आता दुसर्‍याची पाळी
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- तवा आणि पोळी✔

  96. काळी मी आहे परंतु कोकिळा नाही
    लांब मी आहे परंतु काठी नाही
    थांब मी जाते परंतु दोरी मी नाही
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- वेणी✔

  97. ना खातो मी अन्न
    ना घेतो मी तुमच्याकडून पगार
    तरीही देतो पहारा दिवस रात्र
    सांगा पाहू मी आहे तरी कोण

    उत्तर- कुलूप✔

  98. सुरेश च्या वडिलांची चार मुले
    रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा

    उत्तर- सुरेश✔

  99. संपूर्ण पृथ्वीची करतो मि सैर
    परंतु कधीही जमिनीवर ठेवत नाही पैर
    दिवसा काढून झोपा
    रात्रभर मी जागतो
    सांगा पाहू मी कोण असतो

    उत्तर- चंद्र✔


  100. मी गोष्ट कशी आहे जी
    फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गरमच राहणार
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- गरम मसाला✔

  101. उंचावरून पडली एक घार
    तिला केले मारून ठार
    आतील मास खाऊ पटापट
    गोड रक्त पिऊ गटागट
    ओळखा पाहू मी कोण

    उत्तर- नारळ✔

  102. ऊनात चालताना मी येतो
    सावलीत बसता मी जातो
    वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- घाम✔

  103. वाचण्यात आणि लिहिण्यात
    दोन्ही ठिकाणी असते माझे काम
    मी नाही कागद मी नाही पेन
    सांगा काय आहे माझं नाव

    उत्तर- चश्मा✔

  104. उंच वाढतो मी रंग आहे हिरवा
    तुम्ही फक्त जमिनीत थोडे पाणी मुरवा
    प्रदूषण करतो मी कमी
    निरोगी पर्यावरणाची देतो मी हमी
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- झाड✔

  105. paheli in marathi
  106. चार बोटे आणि एक अंगठा
    तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
    सर्वजण बेजान म्हणतात मला
    तरी नेहमी उपयोगी मी राही
    सांगा पाहू मी कोण

    उत्तर- हातमोजे✔

आम्हाला आशा आहे कि मराठी कोडी | Marathi puzzles | Marathi riddles आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Mpsc puzzle in marathi with answer ,Marathi puzzle with answer किंवा Marathi riddles with answers ,Whatsapp puzzles with answers in marathi ,Marathi word puzzle संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Whatsapp puzzles marathi ,Marathi shabd kodi papers ,Funny questions in marathi ,Funny questions and answers in marathi ,Marathi kodi answer ,मराठी कोडे सोडवा आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
n with accent copy and paste
१००००+ Text Faces (✿ ꈍ‿ꈍ)˘ε˘˶ ⋐)

4 Comments

Post a Comment

Previous Post Next Post