कविता मराठी जीवन। Heart Touching Marathi Kavita On Life। प्रेरणादायी कविता मराठी
Sad Kavita Marathi {Marathi Poem On Life} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेख मराठीत सर्वोत्कृष्ट मराठी प्रेरणादायी कविता {Best marathi poems on life} पाहायला मिळतील.प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येत असतात हेच प्रसंग काव्यात ओवलेले या लेखात दिसतील.जीवनावर मराठी कविता {Marathi kavita on life} आणि जीवनावर चारोळी {Marathi charolya on life} वाचून तुम्हाला हि खूप आनंद होईल.तर आशा आहे कि आपल्याला हे मराठी कविता प्रेम {Marathi poems on life} जरूर आवडले असतील.
आपल्या स्टेटस ठेवण्यासाठी Marathi kavita on love life ,Poem on life in marathi ,Life poem in marathi किंवा Marathi short poems on life आपल्याला नक्कीच आवडतील तरी हे Poem in marathi on life आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका.
कविता मराठी जीवन
चालणारे दोन पाय किती विसंगत
एक मागे असतो एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतो
मागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहीत असतं
क्षणात सारं बदलणार असतं
याचच नाव जीवन असतं
याचच नाव जीवन असतं
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
Heart Touching Marathi Kavita On Life
भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो
आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं
त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही
विचित्र आहे पण सत्य आहे
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले तर
जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती
चांगले मित्र आणि औषधे हि
आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात
फरक इतकाच की
औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
प्रेरणादायी कविता मराठी
संधी मिळेल तुलाही
लगेच हिरमसु नकोस
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस
प्रेम तुझ्यावर करणारे
कितीतरी लोक आहेत
तुझ्यासाठी जोडणारे
खूप सारे हात आहेत
असे अशा आपल्यांसाठी
तू ही थोडं हसून बघ
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
Marathi Poem On Life
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
सगळेच अश्रू दाखवायचे नसतात
सगळ्याच नात्यांना नावे द्यायची नसतात
स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून
स्वप्न पाहायचीच सोडून द्यायची नसतात
तर ती मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायची असतात
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
मराठी प्रेरणादायी कविता
असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळाली सत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुनी देताना
संकटासही ठणकावुनी सांगावे, आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर
करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
Sad Kavita Marathi
वाट काय पाहतोस
काहितरी करून दाखव
वेळ जाईल निघून
प्रवाहामध्ये तरून दाखव
लाखो आले आणि गेले
बोलून उपदेश सगळे
स्वतः काही नाही केले
फक्त उपदेश दिले
उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ
सत्याची साथ तू देऊन तर बघ
हिंमत आहे तुझ्यात
आयुष्याचा शिखर चढण्याची
स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ
हीच वेळ आहे
योग्य पाऊल पुढे टाकण्याची
काहीतरी करून दाखवण्याची
घाबरू नकोस, निर्णय घे
यश तुझ्याच हातात आहे
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
Best marathi poems on life
जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ
जीवन खूप खडतर आहे थोडं सोसून बघ
चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस
प्रयत्नाचा डोंगर चढून बघ, यशाची चव चाखून बघ
अपयश आलं तर ते निरखून बघ
यश आलं तर ते थोडं वाटून बघ
डाव मांडणं खूप सोपं आहे फक्त थोडं खेळून बघ
स्वतःचं घरटं बांधायचं असेल तर काडी काडी जमवून बघ
जगणं सोपं आहे की मरणं सोपं आहे थोडं तोलून मापून बघ
जीवन एक कोडं आहे जगता जगता ते सोडवून बघ
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
जीवनावर मराठी कविता
तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात
भव्यतेची ओढ मला
स्वप्नं माझी साहसी
झोका घेता आकाशी भिडे
ती ही आहे धाडसी
पुस्तकांचे ओझे माझे
ती लिलया पेलेल का?
झेप घेऊनी धडपडलो
तर ती मला झेलेल का?
नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
तीक्ष्ण विचारांचे बाण
सोसेल का तिच्या बुद्धीला
माझ्या धनुष्याचा ताण
खळाळते हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
मला आयुष्याचा भागीदार
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
मराठी कविता प्रेम
समुद्राने झऱ्याला
हिणवून विचारले
झरा बनून किती दिवस राहणार
तुला समुद्र नाही का व्हायचे ?
त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले,
मोठे होऊन खारे होण्यापेक्षा
लहान राहून गोड बनणे कधीही चांगले
कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितो
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
Marathi short poems on life
कमी तापवलं तर
नासण्याची भीती
जास्त तापवलं तर
आलेल्या दाट सायीमुळे
गुदमर होतो आयुष्याचा
विस्तवावर ठेवलं तर
राखेशिवाय काय सापडेल?
या नैराश्याच्या गोंधळात
म्हणूनच सांगतो मित्रांनो,
आयुष्य जगण्यातच खरी मजा आहे
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
Poem in marathi on life
निघून जाते आयुष्य
खिसे आपुले भरताना
वेळ जाते निघून
दिवस रात्र धावताना
हरवून गेले आहे सारे
सुख विकत घेताना
क्षणभर हसणे सुद्धा
महाग झाले लोकांना
विसरलीत नातीगोती
सारे जवळ असताना
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
आम्हाला आशा आहे कि Famous marathi poems | प्रसिद्ध मराठी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून Poem on women's life in marathi, Kavita in marathi on life, Kavita on life in marathi, Marathi sad kavita on life ,आई-बाबा शायरी संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Famous marathi poets poems ,Marathi kavita baba sathi ,Aai sathi kavita ,Marathi kavita aai sathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.
पाऊस कविता मराठी ।20+ Rain Poem In Marathi । Paus Kavita In Marathi
Noob
ReplyDeletePost a Comment