कुसुमाग्रज कविता। Kusumagraj Kavita In Marathi। Kusumagraj Poems

कुसुमाग्रजांच्या निवडक कविता {Kusumagraj kavita} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात सर्वोत्कृष्ट कुसुमाग्रज प्रसिद्ध कविता {100 Kavita kusumagraj} पाहायला मिळतील.कुसुमाग्रज {Kavi kusumagraj} यांनी अनेक कविता लिहल्या {Kusumagraj poems in marathi} कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता प्रसिद्ध झाल्या.कुसुमाग्रज यांच्या कविता {निसर्ग कविता Kusumagraj} मला खूप आवडतात.आम्ही या लेखात असाच काही सुंदर मराठी कविता कुसुमाग्रज {Kusumagraj kavita sangrah} दिल्या आहेत त्या जरूर वाचा.

आपल्या प्रियजनांना कुसुमाग्रज कविता संग्रह pdf {Kusumagraj yanchi kavita} संदेश देण्यासाठी तुम्ही पाणी कविता मराठी {Marathi poems by kusumagraj} किंवा मुलीवर कविता {Kavi kusumagraj kavita} आपण पाठवू शकतो. जर आपण कोणाला मिस करत असाल तर कुसुमाग्रज कविता संग्रह {Kusumagraj kavita marathi} हे विचार वापरू शकता.तर आशा आहे कि आपल्याला मराठी कविता संग्रह कुसुमाग्रज {Kusumagraj poems list} जरूर आवडले असतील.


Kusumagraj Kavita In Marathi

कणा मराठी कविता | Kana Kavita

कणा
ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील”
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


स्वातंत्र्यदेवीची विनवणी
पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सरणार कधी रण
सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

शहाणपण
इथे वाटतं प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी हातून चुका
तरी करतात बहाणे

वाईट नसतं कोणालाही
मनापासून चाहणे
मात्र वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे

जरूरी असतं प्रत्यकाने
वकुब ओळखून राहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाह पतित वहाणे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


कुसुमाग्रज कविता कणा | Kana Marathi Kavita

जोगीण
साद घालशील तेव्हाच येईन
जितकं मागशील तितकच देईन
दिल्यानंतर देहावेगळ्या
सावली सारखी निघुन जाईन
तुझा मुगूट मागणार नाही
सभेत नातं सांगणार नाही
माझ्यामधल्या तुझेपणात
जोगीण बनून जगत राहीन
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

स्वप्ननगरच्या सुंदर माझया
स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती

मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला

जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

तिमिरातुनी तेजाकडे
तिमिरातुनी तेजाकडे...
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

चार होत्या पक्षिणी त्या
चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी
दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती
बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा
कोकिळेने काय केले ? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले
ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


आम्हाला आशा आहे कि Fakt ladh mhana poem | कुसुमाग्रज मराठी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Kusumagraj marathi kavita aai ,Aai kavita kusumagraj, Famous marathi poets poems, फक्त लढ म्हणा कविता संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले लहान मुलीवर कविता, Marathi prem kavita kusumagraj, Vi va shirwadkar kavita, Kusumagraj kavita pdf, वि वा शिरवाडकर कविता आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post