नवरा बायको प्रेम कविता। Marathi Kavita On Life Partner । नवरा बायको स्टेटस

नवरा बायको नाते कविता {Navra bayko nate in marathi} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेख मराठीत सर्वोत्कृष्ट प्रेम कविता मराठी शायरी {Husband wife relation quotes in marathi} पाहायला मिळतील.प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम हे असतेच मग ते आईवडिलांचे असो ,नवरा बायकोचे असो किंवा साथीदाराचे असो.प्रेमाने आपले विश्वच बदलून जाते.या लेखात दिलेल्या बायको साठी शायरी {Navryasathi status} किंवा नवरा बायको कविता {Navra bayko prem} ह्या आपल्याया प्रेमातील गोडवा सांगतात.बायको स्टेटस {Navra bayko status} आपल्याला प्रेम करायचे कसे हे शिकवतात.कविता प्रेम मराठी {Bayko marathi status} किंवा मराठी प्रेम कविता चारोळ्या {Marathi love status for wife}आपल्याला साथीदाराला पाठवून त्याचे प्रेम मिळवू शकता.

Table of content ➤
बायको साठी प्रेम संदेश {Wife Quotes In Marathi}
नवऱ्यावर कविता {Love Poem In Marathi For Husband}
नवरा बायको नाते कविता {Husband Wife Quotes In Marathi}

आपल्या साथीदाराला नवरा बायको प्रेम शायरी {Navra status in marathi} संदेश देण्यासाठी तुम्ही मराठी बायकोसाठी प्रेमाचे संदेश {Love message for wife in marathi} किंवा बायको साठी प्रेमाचे संदेश {Bayko sathi kavita} आपण पाठवू शकतो. जर आपण कोणाला मिस करत असाल तर बायको साठी कविता {Marathi kavita on husband wife relationship} हे विचार वापरू शकता आणि त्याना अजून आनंदी करू शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे मराठी कविता प्रेम {Marathi love msg for wife} जरूर आवडले असतील.


बायको साठी प्रेम संदेश {Wife Quotes In Marathi}

प्रेमाची कविता {Love quotes for wife in marathi} किंवा बायको कविता {Love quotes in marathi for wife} आपल्याला आवडल्या असतील अशी अशा आहे

नवरा बायको प्रेम कविता

बायको असावी भांडण करणारी
असावी हक्काने मारणारी
पण असावी नेहमी
माझ्या सोबत उभी राहणारी
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण

पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी, कुणा येई तराणे

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

तू खूप प्रेम करतेस म्हणून
तुझ्याशी भांडायला आवडते

भांडण झाल्यावर
तुझा रुसवा काढायला आवडते

तू जवळ नसल्यावर तुझी
आठवण काढायला आवडते

आणि तू जवळ असल्यावर
तुला चिडवायला आवडते

तुझ्यावर प्रेम करत नाही
हे भासवायला आवडते

आणि तू जवळ नसल्यावर
तुझ्या आठवणीत रडायला आवडते
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती

काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं
आज आहे उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं
एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु
प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून
जात नसतं
कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला
कसलीच तोड नाही
मला आता तुझ्याशिवाय
कसलीच ओढ नाही

तुझ्या निखळ मनात
अडकून राहायला होतं
तुझ्या निरागस हसण्यात
हरवून जायला होतं

तुझ्या आवाजातील बंदिश
जीव ओढून नेते
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझे प्राण घेते

या वेड्यांचे प्रेम फक्त
तुझ्यावरच असेल
तू प्रेम दे अथवा नको देऊस
पण साथ मात्र माझी नेहमी असेल
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


नवऱ्यावर कविता {Love Poem In Marathi For Husband}

माझा नवरा कविता {Poem for husband in marathi} किंवा पतीसाठी कविता {Love sms in marathi for husband} आपल्याला आवडल्या असतील अशी अशा आहे

Marathi Kavita On Life Partner

प्रेमाची तुझी साद, मनाला आनंद देते
कितीही कठोर वागलो तरी तू कायम आनंद देतेस

संसार म्हटला की, आल्या कुरबुरी
तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस

इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस
तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

मी मागे नसतानाही
असल्याचा भास होतो ना तुला
लोकांशी महत्वाचं बोलतानाही

माझा जोक आठवतो ना तुला
आपण गर्दीत चालतानाही

माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला
इतरांसोबत जोरात हसतानाही

माझा दुरावा रडवतो ना तुला
कधी उदास वाटतानाही

माझा चेहरा हसवतो ना तुला
तुला नको असतानाही

माझा आवाज लाजवतो ना तुला
तू शब्दांनी नाकारतानाही

चेहराच सांगतो ना
मी आवडतो तुला
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

सखे
हातात हात घेशील तेव्हा
भिती तुला कशाचीचच नसेल
अंधारातील काजवा तेव्हा
सूर्यापेक्षा प्रखर दिसेल

सहवासात तुझ्या
आयुष्य म्हणजे
नभात फुललेली
चांदणरात असेल
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळुवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे
विरह सागरात हरवलेली नाव
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी
आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी
नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला
कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

नवरा बायको नाते कविता {Husband Wife Quotes In Marathi}

नवरा बायको प्रेम कविता संग्रह {Marathi kavita on husband wife} किंवा बायको शायरी {Wife status marathi} आपल्याला आवडल्या असतील अशी अशा आहे

नवरा बायको स्टेटस

तुझ्या कवेत मला
माझे आयुष्य सारे काढायचे आहे
तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे

तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ
तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

तुझ्या कुकंवाशी
माझं नात जन्मोजन्मी असावं
मंगळसूत्र गळ्यात घालताना
तू डोळ्यात पाहून हसावं

कितीही संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
देह तुझ्या मिठीत असावा
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

हजारो नाते असतील पण त्या
हजार नात्यात
एक नाते असे असते
जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा
सोबत असतो तो म्हणजे नवरा
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो कोडगा आहे
जणु माझा पोरगा आहे
कधी तो माझा पप्पा आहे
मनातला नाजूक कप्पा आहे

थोडासा तो चिडका आहे
पण मायेचा झरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे

लहानांशी त्याची गट्टी आहे
थोडासा तो हट्टी आहे
त्याला वाटतं तो धाडसी आहे
मला वाटतं तो आळशी आहे
थोडासा तो हळवा आहे
माझ्या जिवनाचा वारा आहे

खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो भावनिक आहे
राग त्याचा क्षणिक आहे
नव्या कल्पनेत उडणारा आहे
जुन्या आठवणीत रमणारा आहे
नव्या स्वप्नात रंगणारा आहे
त्याच्यामुळे सौख्य घरा आहे

खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो ज्ञानी आहे
सुखी आणि समाधानी आहे
संयम थोडासा कमी आहे
जिभेनं थोडा कडवा आहे
पहिल्यापेक्षा बरा आहे
मी कुठं म्हणते हिरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
-Dr Subhash Katakdound
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

आम्हाला आशा आहे कि Marathi prem kavita for girlfriend | नवरा बायको नाते कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून प्रेम कविता चारोळ्या {Love poems in marathi for girlfriend},Poem for wife in marathi {प्रेम कविता चारोळ्या},Marathi kavita on marriage life संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले प्रेम कविता मराठी डाउनलोड {Premachya kavita} ,मराठी प्रेम कविता चारोळ्या pdf {Navra bayko love status marathi},मराठी प्रेम कविता संग्रह {Navra bayko shayri},Marathi msg for wife आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post