प्रेम कविता मराठी। Prem Kavita In Marathi । Marathi Kavita On Love
मराठी प्रेम कविता {Marathi kavita prem} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात सर्वोत्कृष्ट प्रेम कविता चारोळ्या {Marathi poem on love} पाहायला मिळतील.प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम हे असतेच मग ते आईवडिलांचे असो ,भाऊबहीणीचे असो किंवा साथीदाराचे असो प्रेमाने आपले सामुर्ण विश्वच बदलून जाते.या लेखात दिलेल्या प्रेमाच्या चारोळ्या {Prem kavita marathi} किंवा प्रेमाची कविता {Marathi kavita love} ह्या आपल्याया प्रेमातील गोडवा सांगतात.प्रेम चारोळ्या {Marathi prem kavita} आपल्याला प्रेम करायचे कसे हे शिकवतात. कविता प्रेम मराठी {Marathi prem kavita charolya} किंवा मराठी प्रेम कविता चारोळ्या {Marathi poem love}आपल्याला साथीदाराला पाठवून त्याचे प्रेम मिळवू शकता.
Table of content ➤
प्रेम कविता मराठी शायरी {Love Poem In Marathi}
प्रेम कविता चारोळ्या {Heart Touching Marathi Kavita On Life}
आपल्या प्रियजनांना कविता मराठी प्रेम {Marathi kavita on love life} संदेश देण्यासाठी तुम्ही मराठी प्रेम कविता संग्रह {Marathi poems on love} किंवा प्रेमाच्या कविता {Prem kavita marathi text} आपण पाठवू शकतो. जर आपण कोणाला मिस करत असाल तर मराठी कविता प्रेमाच्या {Marathi love poems for him} हे विचार वापरू शकता आणि त्याना अजून आनंदी करू शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे मराठी कविता प्रेम {First love poem in marathi} जरूर आवडले असतील.
प्रेम कविता मराठी शायरी | Love Poem In Marathi
प्रेम मराठी {Romantic marathi kavita} किंवा कविता संग्रह मराठी {Love poems in marathi romantic} आपल्याला नक्की आवडतील.
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप
तुझ्या आठवणीने मला सावरल आहे खुप
मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करत होतो
माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप
दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम
मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
प्रेम हे जिवनासाठी आहे
पण जीवन हे प्रेमासाठी नाही
प्रेम हे जिवनात असु शकते
पण जीवन प्रेमात असु शकत नाही
प्रेमात जीवन वाया घालवू नका
पण जीवनात प्रेम करायला विसरु नका
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ
सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे
असे असावे प्रेम केवळ
सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
निरपेक्ष प्रेम असतं काय
तुझ्यामुळेच मला समजलं
माझं नावं तुझ्या नावाशी
तेव्हांच आहे मी जोडलेलं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
Make Your Full Screen Black Now 💻
कातर वेळचा गार वारा
तुझी स्मृती घेऊन भेटतो
मिट्ट काळोख येता गारवा
पाऊस अलगद मनात दाटतो
आज डोळ्यांना रडावेसे वाटते
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
ज्या गोष्टी न सांगता समजतात
अगं वेडे त्यालाचं तर प्रेम म्हणतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
प्रेम करणं सोपं नसतं
प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
तिला चीडवल्यावर
तिने मुद्दाम रुसाव
मग तिला मनवन्यासाठी
तिला सुंदर गुलाबाच फुल द्याव
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला
माझच नाव निघाव
स्वप्नातही तिला मीच दिसावं
अस कधीतरी घडाव
कुणीतरी नक्कीच
माझ्यावर प्रेम कराव
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
प्रेम हृदयातील एक भावना
कुणाला कळलेली कुणाला कळून न कळलेली
कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली
तर कुणी आयुष्यभर लपवलेली
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली
तर कुणाची गंमत झालेली
कुणाचे आयुष्य उभारणारी
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी
प्रेम फक्त एक भावना
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
अचानक मिठीत घेता
मज तू साजणा
शहारुन जातं मन माझं
होऊन जीव बावरा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना
शेवटी ठरवल विसरुन जायचं तुला
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग
खुपच अरुंद असतो
ज्याच्यावरुन दोघेजण
कधीच एकत्र चालू शकत नाही
कारण त्यांना पुढे चालण्यासाठी
मनापासुन एक होणे गरजेचे आहे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
आठवणीत कधी जेव्हा मन वेड हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग आसवांना लपवते
लपलेच प्रेम आणि न विसरलेल्या आठवणी
ढगाळलेल ते वातावरण पण कोसळत नाही
आता पुन्हा त्याच टपोर्या थेंबाच्यासरी
वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
आजही मन माझे खूप उदास
अजून होतो तुझ्या त्या आठवणींचाच आभास
होत नाही आजहीं विश्वास
खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्यावर
चेहऱ्यावर येणारी Smile हे प्रेम आहे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ
सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे
असे असावे प्रेम केवळ
सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव
तिने हळूच माझ्याकडे बघाव
मी बघतांना तिने हळूच लाजाव
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव
मी दिसताच तिने मग हळूच हसाव
आणि मी नसतांना तिने रडाव
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
प्रेम कविता चारोळ्या | Heart Touching Marathi Kavita On Life
वेदना कविता मराठी {Marathi romantic poems} किंवा मराठी कविता चारोळ्या {Marathi kavita for love} आपल्याला नक्की आवडतील.
ती खूप गोड हसते
कि हसताना ती खूप
गोड दिसते ह्यातला फरक मला
कधीच कळत नाही
ती हसताना मी फक्त तिच्याच
चेहऱ्याकडे पाहत बसतो
कारण हसताना तिचा चेहरा असा खुलतो
जशी गुलाबाची एक कळी फुलते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप् रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
तुझे प्रेम मजला आनंद देई
तुझ्या डोळ्यात वसे माझे जग सारे
तुझ्या हृदयात वसे प्रेम माझे
तुझा हात हातात घेऊन ह्या जीवनाचा आनंद घेऊ
चल एकदा आपण दुर कुठे तरी जाऊ
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले
रुसले होते ते प्रेम माझे
जे तुझ्या साथिने परत आले
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले
तुच आहेस त्या स्वप्नांना जागवणारी
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
खरे प्रेम असावे कमळासारखे
जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही
खरे प्रेम असावे गुलाबासारखे
जे कोमल आणि सुगंधी जरी असले
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही
खरे प्रेम असावे आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण
कुठेही गेले तरी न संपणारे
सदैव आपल्या बरोबर असणार कारण
प्रेम हा काही खेळ नाही
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना
पाहिले तर नाते
म्हटले तर शब्द
वाटली तर मैत्री
घेतली तर काळजी
तुटले तर नशीब
पण मिळाले तर स्वर्ग
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
तू आहेस सोबत म्हणूनच
शब्द बोलत आहेत
अबोल्याचे क्षण त्यांनी
कित्येक दिवस पाहिले आहेत
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
मनातलं सर्व माझ्या तिला
केव्हापासून सांगायचं होतं
सांगताच ती लाजून म्हणाली
मला तर आधीच माहीत होतं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
मनाच्या खोल कुठेतरी
विचारांचं खळबळ माजलयं
विरहाचं धुकं नात्यात दाटलयं
अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी
तुला दिलेल्या एका वचनापायी
गालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
कातर वेळचा गार वारा
तुझी स्मृती घेऊन भेटतो
मिट्ट काळोख येता गारवा
पाऊस अलगद मनात दाटतो
आज डोळ्यांना रडावेसे वाटते
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
माझ्या मनातलं प्रेम
तुला कॉल करू शकत नाही पण
तुझी केअर करायला खुप आवडत
तुला मॅसेज करू शकत नाही पण
तुझा विचार करायला खुप आवडत
तुला रोज भेटु शकत नाही पण
तुला मिस करायला खुप आवडत
कस मी सांगु तुझ्यावर प्रेम
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
वेचते मी क्षण
मिळतात श्वास तुझ्यातले
करावा दूर आसव दुराव्याचा
जोडून भाव मनातले
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
अंग तिचे शहारले होते
मन तिचे बावरले होते
चेहऱ्यावरच्या बटांना मी
ओठांनी सावरले होते शब्द मनातले
गुंतली होती ती माझ्यात
विसरून गेली ती भान सारे
देह भिन्न आमचे पण
हृदय एक आम्हा जाणवले होते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
प्रेम कधी रुसण असतं
डोळ्यांनीच हसणं असतं
प्रेम कधी भांडतसुद्धा
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं
घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे म्हणजे प्रेम
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम
आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
गुलाबाचं फुल देणं प्रेम असतं
पाकळीसमान तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखासाठी आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
सोबत राहून साथ तिची देणं म्हणजे प्रेम असतं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
तुझी सोबत असताना
जीवनात फक्त सुखांचीच
अविरत बरसात असेल
प्रेम काय आहे माहीत नाही
पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल
तर मला जन्मो जन्मी हवयं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणे प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
कुणीतरी असावं
गालातल्या गालात हसवणारं
भरलेल्या आसवांचे डोळे पुसरणारं
कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं
केल पोरकं जगानं तरी आपले करुन घेणारे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
आम्हाला आशा आहे कि Marathi prem love poem kavita real love | मराठी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून मराठी कविता संग्रह {मराठी कविता संग्रह},Romantic marathi poems {कविता मराठी जीवन},Romantic kavita in marathi ,Romantic kavita marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पाऊस कविता मराठी {Emotional marathi poem on love} ,मराठी कविता संग्रह pdf {Love poems in marathi romantic},मराठी चारोळ्या {Marathi love kavita},Love charoli in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.
Post a Comment