Home Aaji Aajoba Quotes In Marathiआजी कविता {मराठी कोट्स}| Aaji Quotes In Marathi | 50+ Aaji Aajoba Quotes In Marathi

आजी कविता {मराठी कोट्स}| Aaji Quotes In Marathi | 50+ Aaji Aajoba Quotes In Marathi

by Micah

आजी कविता {मराठी कोट्स}| Aaji Quotes In Marathi | Aaji Aajoba Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आजी शायरी मराठी {Aaji quotes in marathi} दिलेले आहेत.आपल्या जीवनात आपल्या आजीचे खूप महत्व असते.आजी म्हणजे प्रेम काळजी आणि गोड खाऊ यात गेलेले आपले बालपण असते.आपल्या लाडक्या आजीला आपल्या हृदयातील भावना सांगण्यासाठी आपण माझी आजी कविता {Aaji status in marathi} विचार पाठवू शकता. आजी स्टेटस मराठी {Missing grandmother quotes in marathi} वाचून तुमच्या आजीला आनंद होईल.तुम्ही जर माझी आजी निबंध {Majhi aaji nibandh in marathi} लिहीत असाल तर हा लेख तुम्हाला खूप मदत करेल.आजीला आपले प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही आजी आजोबा कविता {Quotes on grandmother in marathi} आपल्या स्टेटसला ठेऊ शकता.

आपल्या आजीआजोबांना संदेश {Aaji aajoba quotes in marathi} देण्यासाठी तुम्ही आजी स्टेटस {Miss u aaji status in marathi} किंवा आजी वर कविता मराठी {Aaji kavita in marathi} आपण पाठवू शकतो. जर आपण आजीला मिस करत असाल तर आजी कविता मराठी {Short quotes on grandmother in marathi} हे विचार वापरू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे आजी विषयी कविता {Miss you aaji marathi status} जरूर आवडले असतील.


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजी कविता

आजीची माया असतेच अशी
मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी ????

आजीची माया असतेच अशी
तूप रोटी साखर खावी जशी ????

आजीची माया असतेच अशी
मुरंब्याची गोडी वाढावी जशी ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

छान छान गोष्टी म्हणजे आजी
लहानपणीच्या भरपूर आठवणी म्हणजे आजी ????
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी
रानातली मस्त सैर म्हणजे आजी ????
जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी
गोड खाऊचा डब्बा म्हणजे आजी ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

कधी बाबा रागवले की आपली आई वाचवते ????
जर आई रागावली की आपली आजी वाचवते
माझी लाडकी आजी माझे संपूर्ण जगच सजवते ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा
आजी मला तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा ????

आजी म्हणजे माझ्या जीवनातील सुंदर पान
भरपूर आठवणी गोष्टी आणि संस्काराचा अमूल्य साठा छान

नातवंडांना आवडणारी माझे सर्व लाड पुरवणारी ????
आई-वडिलांचा मार चुकवणारी

मला कुशीत घेऊन झोपवणारी ????
मला कडेवर घेऊन फिरणारी

हळव्या मनाला माझ्या समजून घेणारी
जुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवणारी ????

माझी लाडकी आजी
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

प्रिय आजी ????
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी ????
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद ????
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू ????
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे
हेच त्याच्याकडे मागणे ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Aaji Quotes In Marathi

चालते वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल ????
वाढले असले वय जरी
तरी आजी माझी आहे कमाल ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

अनुभवांनी भरलेले आयुष्य
चालून थकते काही पावले ????
जवळ जाता ओळखते न पाहता
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

तू मला अंगाखांद्यावर खेळवले
तूच मला जीवन जगणे शिकविले ????
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

घरातल्या सर्व खोल्या सोडून
आजी जिथे असेल तिथेच वावरायला मला आवडते ????
आजी जिथे असेल तेच घर वाटते
आजीने बनवलेले जेवणच सगळ्यात भारी लागते ????

गावी गेल्यावर अजूनही
तिच्याच कुशीत झोपायला आवडते
आजी जिथे असेल तेच घर वाटते ????
किचनमध्ये तिच्या आसपास लुडबुड करायला मला आवडते

नवीन पदार्थ बनवत असताना ✨
आजीला कृती वाचून दाखवायला ओट्यावर बसावे लागते
आजी जिथे असेल तेच घर वाटते ????
आजी बाहेर गेल्यावर घर मोकळे मोकळे वाटते

मन आजीला शोधत भटकत राहते
तेव्हा कळते कि आजी आहे म्हणूनच घर घर वाटते ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर पान
खुप आठवणी गोष्टी संस्काराचा साठा ????
आजी ही व्यक्ती तशी नातवंडांना आवडणारी
मग ते लाड करण्यासाठी असो किंवा ????
आई बाबाचा मार चुकवण्यासाठी
बरंच काही शिकवण्यासाठी ????
जुन्या काही परंपरा आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी
आजीसारखं माध्यम नाही ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजी ????
दाटलेल्या नयनांमध्ये उभी राहते
मूर्ती आजी तुझ्या हसऱ्या मुखाची
अजूनही आठवण येते झोपताना ????
मला आजी तुझ्या ऊबदार कुशीची
आजी तू पुन्हा प्रेमाने मला तुझ्या कुशीत घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ?

आजही आठवते मला गोडी ????
आजी तू केलेल्या पदार्थांची
माझ्या हट्टापायी केलेल्या
आजी तुझ्या हातच्या मासवड्यांची ????
आजी तू पुन्हा मला मायेचा घास भरवशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ?

आलो गावी घरी कधी तर ✨
आजी होते जाणीव मला तुझ्या अस्तित्वाची
अलगद भासवून जाते मनी
मला पाहून झालेल्या तुझ्या आनंदाची ????
आजी तू पुन्हा मला कुरवाळून मुका माझा घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ? ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Aaji Aajoba Quotes In Marathi

आजी सोडून गेली
मन माझे उदास उध्वस्त झाले ????
काही सांगायचे आज न उरले
सगळ्या गोष्टीत आजी तुझी आठवण येते ????
कधी तिला परत भेटेल असे मला झाले

काही सांगायचे आज न उरले
मन उदास माझे झाले ????
मन उध्वस्त माझे झाले
सगळे सोडून अचानक गेलीस तू आजी
काही सांगायचे आज न उरले ????


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजी
तू जाऊन वर्षे झाली तरीही आजी ????
तू सांगितलेल्या गोष्टींचा ओलावा अजून जाणवतो आहे
जुनाट साड्यांतून साकारलेल्या गोधडीतून ????
आजी तुझी ऊब आजही मी अनुभवतो आहे

तुझे थरथरते ओठ ????
आजी आता माझ्या गालावर प्रेम ओसंडत नाहीत
कोणतेही पुस्तक आणल्यानंतर ????
आजी तुझ्या आठवणी आल्याखेरीज राहत नाहीत

घर सुद्धा आता सुनंसुनं वाटते
अजूनही वाटते आजी तुझे बोट कितीही दुखले
तरी फोडत बसायचीस शेंगा दिवसभर ????

आता जाणवतोय आमच्याच अहंकाराचा हिंदोळा
खरेच आठवतोय तुझा मायेचा झोपाळा ????
चाललोय तर आहोत घेऊन भार भविष्याचा
निर्धार हवा आहे आजी तुझ्या प्रेमाच्या संचिताचा ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सावलीत मी तुझ्या
हक्काने वाढत गेलो आजी ????
काळजीने तुझ्या
हळवा होऊन गेलो आजी ????

नातू म्हणून मी तुझा
मी धन्य धन्य झालो आजी
आजी तुझी ती अनमोल साथ ????
सदैव राही माझ्या मनात

आजी तू लक्ष्मी वरदा माझी
माझ्या सर्व गोष्टींना तू राजी ????
आजी तु आमच्या प्रेमाचे समर्पण
हे आजी अगदी झाले अर्पण
एकटी करुनी गेली तू आम्हा न बघता हे दर्पण ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

घरात असते एक प्रेमळ म्हातारी
म्हणतात तिला सगळे आजी ????

जोपर्यंत असते आपल्या सोबत
नाही कळत आजीची किंमत ????

चेहरा आजीचा आहे सुकलेला
पण तिच्या हृदयात मात्र प्रेमाचे पाणी ????

नसते काही इच्छा आजीची
फक्त द्यावा तिला थोडावेळ कुणी ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Corona मुळे गावी मी गेलो
आजीने माझ्या डोक्यावरून हात फिरवत ????
कडकड आपली बोटे मोडलीत
आणि पटकन माझा एक मुका घेतला ????
आणि तिथेच कोरोना हरला आणि
माझ्या आजीचे प्रेम जिंकले ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Majhi aaji nibandh in marathi

मन हे ओथंबून आले
मनात आजी तुझेच चित्र दिसले ????

आजी तू कोरून गेली छाप प्रितीची
माया दिलीस तू मला मातृत्वाची ????

आजी लाभली प्रेमळ दिलाची
निरंतर सुख असावे आजी तुझ्याच साठी ????


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेल्या घरात
आता नाही वाट बघणारी माझी आजी ????
मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवायला
आता नाही माझी आजी ????

लिहायला जमलेच नाही तू असताना
लिहिल्या कविता आजी तुझ्यासाठी
कारण शब्द सुद्धा कमी पडायचे ????
आजी तुझे प्रेम व्यक्त करताना

आजी तु नसल्याने पोकळ वाटतेय माझे आयुष्य ????
काही कळेनासे झाले आहे की कसे राहील माझे भविष्य
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

खूप भाग्यवान लोकांना मिळते आईची साथ
परंतु मी इतका भाग्यवान नाही ????
कारण मी आईपासून कधीच दुरावलो आहे
पण माझे भाग्य आहे की ????
मला आईची माया देणारी आजी मिळाली

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Miss you aaji marathi status

दोन रंगाच्या आजीने शिवलेल्या
गोधडीतील ऊब सांगते ????
आयुष्यभर सोबत फक्त आठवणींचीच

कारण आजी थोडी आयुष्यभर पुरते ????

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

माझी “अशिक्षित” आजी म्हणायची
मेंदूला कुलूप लावून चावी गटारीत फेकलेल्या ????
“अडाणी लोकांच्या” नादी लागून
त्यांना कधी समजवत नाही बसायचे ????
कारण त्यात आपलाच वेळ जातो
पण आता समाजातील so called “प्रतिष्ठित हुशार”
लोकांनीच जुन्या बुरसटलेल्या
किंवा एक विशिष्ट विचार मेंदूत ठेऊन ????
मेंदूची चावी फेकून दिलेली दिसते
तर त्या “प्रतिष्ठित हुशार” असलेल्या लोकांचे काय करायचे ????
हे काय आजीने सांगितलेच नाही बुवा ?
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

त्याला पाहिले अन् माझी नजर खिळली होती
तुला देखणा नवरा मिळेल असं आजी म्हणली होती ????

रमताना संसारात घरी जाणे विसरून जाते हल्ली
माहेरी परतायची नाहीस तू असं आजी म्हणली होती ????

घरातली काडी पण मर्जीविना माझ्या हलत नाही
सासरी राज्य करशील असं आजी म्हणली होती

दोघांच जगने अन् आनंदाचा संसार करशील ????
नांदा सौख्यभरे असं आजी म्हणली होती

माझ्याच आयुष्याला दृष्ट लागेल माझी ????
नक्की कोणत्या मुहूर्तावर सुखी राहा आजी म्हणली होती


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजीच्या थरथरणाऱ्या हातांची
मऊशार माया ????
मला वाटते हवीहवीशी
मनात साठवाया ????

आजीच्या मांडीवर डोके ठेऊन
आकाशतल्या चांदन्या मोजव्यात
आजीने सांगितलेल्या कथेत ????
स्वतःचा एक नवीन शोध लागावा

तिचा पदर धरून
मग मागे-मागे फिरावे ????
बाबांकडून हट्ट पुरवण्यासाठी
आजीला लाडीगुडी लावावे ✨

आजी तुझ्या हातांची चव
या संपूर्ण जगात कुठेच नाही ????
आणि तू घास भरवल्याशिवाय
आजी माझी भूक संपत नाही ????

तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया
आजी नको सोडूस मला कधी ????
कारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला
पूर्णत्व येणार नाही ????
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Miss u aaji status in marathi

आजी माझी जशी चंद्रकोर
जगण्याचा तिचा अनुभव थोर ????

कपाळावर तीच्या आठी
शिकवितात जीवनातील ????
आडकाठींच्या गाठीभेठी

तशी धडधाकट आहे माझी आजी ????
बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी

आजीच आमचा पाया ????
आणि आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि Miss You Aaji Status In Marathi | माझी आजी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आजोबा Aaji marathi kavita {भावपूर्ण श्रद्धांजली आजी},Poem on aaji in marathi {माझे आजी आजोबा मराठी निबंध},Majhi aaji essay in marathi ,Ajoba quotes in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी कविता आजी {Miss u quotes in marathi} ,आजीसाठी स्टेटस {Mazi aaji essay in marathi},आजी कविता संग्रह {Happy birthday aaji in marathi},Aaji birthday wishes in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤

आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | 25+ Aai Kavita In Marathi

मावशी विषयी सुंदर कविता | 25+ Mavshi Quotes In Marathi

वडील चारोळ्या मराठी {60+ कविता} | Poem On Father In Marathi | Baba Quotes In Marathi

आजोबा कोट्स मराठी {कविता} | Grandfather Quotes In Marathi | 20+ Ajoba Quotes In Marathi

Leave a Comment