♛ ॥રાખા શિવછત્રપતી॥ शिवविचार [२५०+] Quotes About Shivaji Maharaj | Shivaji Maharaj | Chhatrapati Shivaji Maharaj Photo - ह्या पोस्ट मध्ये आपल्या पाहायला मिळतील Shivaji Maharaj Original Photo , Shivaji Maharaj Jayanti . छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील धाडसी आणि शिस्तप्रिय शासकांपैकी एक त्यामुळेच त्याचे आजही करोडो चाहते आहेत.त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे देशाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. त्यासाठीच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Shivaji Maharaj Quotes In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांवर असे काही Quotes जे त्याचे विचार दर्शवतात. त्याचे आचरण आणि विचार हे नेहमीच लाखो युवकांसाठी आपल्या भविष्यासाठी मार्गदर्शक राहिले आहेत . हे आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी नेहमीच मदत करतील. औरंगाजेबाच्या अतिबलशाली मुघल साम्राज्याला कडवा प्रतिकार देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मजबूत ,कणखर मराठी सत्तेचा पाया घातला . त्यांचे जीवन, त्यांच्या सैन्य मोहिमा,शिवाजी महाराजांचे विचार आणि दूरदृष्टी आणि देशभक्ती अनेक शतकांपासून देशभक्त भारतीयांना प्रेरणा देत आहेत.आई जिजाऊचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणले.शाहिस्तेखानाची फजिती,अफजलखानाचा वध,सुरतेची लूट ,मोगलांशी संघर्ष अश्या अनेक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. Shiv Jayanti Status In Marathi ह्या पोस्ट मध्ये आपण असाच प्रसंगावर काही quotes लिहले आहेत ते तुम्ही अवश्य वाचावेत त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि ते तुम्हाला नक्कीच आवडतील.जर आपल्याला आमचे Shivaji Maharaj Shayari Marathi आवडले असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा आणि फेसबुक ,इंस्टाग्राम ,पिंटरेस्ट ,sharechat वर जरूर share करा .
कोटी देवीदेवतांची अब्जावधी मंदिरे असूनही एकही मंदिर नसून जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना "छत्रपती शिवाजी महाराज" म्हणतात . जय जिजाऊ जय शिवराय.
😊 प्रेरणादायक [५००+] Good Morning In Marathi | Good Morning Images With Quote
राजा शिवछत्रपती सांगायला सोपे आहेत, राजा शिवछत्रपती ऐकायला ही सोपे आहेत आणि राजा शिवछत्रपती जयघोष करणे सुद्धा खुप सोपे आहे पण राजा शिवछत्रपती अंगीकारणे खुप कठीण आहे आणि जो राजा शिवछत्रपतीना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या संपूर्ण जगावर राज्य करेल.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जगात एकूण १९५ देश आहेत त्यातलाच एक भारत देश भारत देशात एकूण २८ राज्य आहेत 9 केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमी महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला खुप अभिमान आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
साथ भगव्याची कधी सोडनार नाही ,वचन भगव्याचे कधी मोडनार नाही,घेतला तो अखेरचा श्वास ,होईल हा काळही स्तब्ध,ना पर्वा शत्रूची ,ना असे पराभवाची खंत,आम्ही आहोत फक्त शिवशंभुचे भक्त.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ना नीलकंठ तो कैलाशपती ना एकदंत तो गणपती नतमस्तक त्याच्या चरणी ज्यांनी केली हिंदवी स्वराज्य निर्मिती दैवत माझे एकच राजा शिवशंभूछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
शत्रू समोर असताना अडचणींचा सामना करण्यास धैर्य असणे आवश्यक नाही विजय हा पराक्रमात आहे .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सुर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा खरा रंगच समजला नसता जर राजे शिवछत्रपती जन्मलेच नसते तर, खरंच हिंदवी स्वराज्यचा अर्थच समजला नसता, हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
अजूनही बोथड झाली नाही धार माझ्या छत्रपतींच्या तलवारीची कोणाचीही हिम्मत नाही कणखर मावळ्यांकडे पाहण्याची, कोणाचीही हिम्मत नाही मराठी माणसाला संपवण्याची , घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. जय जिजाऊ जय शिवराय
शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तो योग्य हेतू व आत्मविश्वासानेही तो पराजीत होऊ शकतो .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
आम्ही फक्त त्यांच्याच पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे असं आमचं दैवत राजा शिवछत्रपती .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा कणखर पर्वतही मातीचा गोळा वाटू लागतो .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सह्याद्रीच्या छाताडातून, जयघोष भवानी गाजे काळजात वसती आमच्या, रक्तात वाहती राजे, तुफ़ान गर्जते, आग ओखते, वाघ मराठी माझा, सन्मान राखतो, जीव झोकतो तुफानं पराक्रमी राजा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् । वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम् ॥ -अर्थ -छत्रपती शिवाजी महाराजयांची जीवनगाथा महान विजयानी सुशोभित आहे. वीरता आणि आश्चर्य यांनी भरलेली ही गाथा रामायण एवढी शुभ आहे .
ज्यांच्या मनात राजा शिवछत्रपतींचा असेल आदर आणि मान त्यांनाच मिळेल आमच्याकडून सन्मान कारण राजा शिवछत्रपतींना मान हाच खरा स्वाभिमान.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जो माणूस त्याच्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी मोठमोठ्या आव्हानांवर मात करतो तोच यशस्वी होतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
वीरता हा माझा आत्मा आहे आणि सुविचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा परमधर्म आहे राजे शिवछत्रपती हे माझे दैवत आहे, होय मी मराठी आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
थोर उपकार तुझे जाहले, सुर्य तेजात चांदणे नाहले, जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहिले, आठवुन तुझ्या शिवशाहीला, अश्रू माझे इथेच वाहिले .जय जिजाऊ जय शिवराय.
एक तेजस्वी पराक्रमी पुरूषही विद्वानांसमोर झुकतो कारण पुरुषार्थ हा सुद्धा विद्येतुनच येतो. जय शिवराय जय शंभूराजे
आई भवानीचा लेक तो मराठ्यांचा राजा होता कधीच झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता.जय जिजाऊ जय शिवराय
राजे असंख्य झाले आजवर या संपूर्ण जगती पण शिवरायांशिवाय मात्र कुणी न जाहला, अभिमान ज्याचा आहे या हिंदवी स्वराज्याला, एकची तो राजा शिवछत्रपती जाहला.जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.
लखलख तळपत होती शत्रूवर शिवरायांची तलवार हिंदवी स्वराज्य घडविणारे तेचं खरे शिल्पकार श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.
माझ्या या रक्ताने धूतले जरी पाय तुमचे, माझ्यावरील तुमचे ऊपकार फिटणार नाहीत , धन्य धन्य माझे शिवराय.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
किती आले आणि किती गेले फक्त एकच राजे शिवशंभू माझे एक कट्टर शिवभक्त.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ओम नमः शिवाय बोलल्याने शक्ती मिळते मनाला,ओम साई बोलल्याने शक्ती मिळते मनाला, श्री राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, जय शिवराय बोलल्याने शंभर वाघांची ताकद मिळते आम्हाला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
श्वासात रोखूनी प्रबळ वादळ , डोळ्यांत रोखली पराक्रमी आग , देव आमचा राजा शिवछत्रपती , एकटा हिंदुस्तानी वाघ.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
एखादी व्यक्ती जी वाईट काळातही पूर्ण जोमाने व कर्तव्य निष्ठेने आपल्या कामांमध्ये व्यस्त असतो त्याचा वेळ नक्की बदलतो . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
धड माणसाचे काळीज वाघाचे ,हीच तर त्यांची आहे अदा, म्हणुनच तर संपूर्ण हिंदुस्तानची जनता,माझ्या "शिवरायांवर" आहे फिदा.जय जिजाऊ जय शिवराय.
मूर्तिकेचे पावित्र्य तू राखिले, हिंदवी स्वराज्य स्वप्न तू साकारिले , गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, राजा शिवछत्रपती तूज मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
आईने सांगितले की दररोज देवाच्या चरणी मस्तक ठेवायचं आणि देवासारखं वागायचं म्हणून रोज शिवरायांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि तलवार सोबत घेऊन फिरतो.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
जर एखाद्या मनुष्यामध्ये प्रबळआत्मविश्वास असेल तर तो मनुष्य आपल्या पराक्रमाने संपूर्ण जगावर विजय मिळवू शकतो.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
विजेसारखी तळपती तलवार चालवून गेला , निधड्या छातीने संपूर्ण हिंदुस्तान हालवून गेला , वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला , स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा राजा शिवछत्रपती होऊन गेला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
योग्य वेळीच तलवार उचलली म्हणून विश्व राहिले ह्या भगव्याचे , राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
देवा जन्म देऊ नकोस दुसरा , या जन्मातच माझे सार्थक झाले, तरीपण तुझी ईच्छा झाली तर, ह्या सह्याद्रीत दे आणि मला माझ्या, शिवरायांच्या पायाची पायधुळ होऊ दे. जय जिजाऊ जय शिवराय
जेव्हा ध्येय हे गाठायचं असते तेव्हा ते साध्य करण्यासाठी कितीही कष्ट, किंमत,वेळ असो, ते द्यावेच लागते .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
शिवरायांच्या कृपेने पाहतो आम्ही हे स्वराज्य शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने शिवरायांचा पराक्रम पाहूनच गर्वाने फुलते आमची छाती देव माझा राजा शिवछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी छाती आमची , तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
प्रौढ प्रताप पुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कि जय. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
प्राणपणाने लढून शिवराया तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे परतून तूच लावले कडवे हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म आई जिजाई पोटी, हे शिवराया तुजला प्रणाम कोटी कोटी.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
मी प्रत्येक वादळ पेलेन मला आत्मविश्वास आहे , माझ्या पाठीशी आकाश अन पायाशी जमीन आहे , पाय जमीनीत घट्ट रोवुन सह्याद्रिसारखा ताठ मी आहे , जाउन सांगा वादळांना, तुमची शिवरायांच्या मावळ्यांशी गाठ आहे .जय भवानी जय शिवाजी.
श्रीमान रायगड हा इतर लोकांसाठी फक्त एक ऐतिहासिक किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र पावन मंदिर आहे स्वर्गाहून सुंदर .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे .
एक होतं गाव हिंदवी स्वराज्य त्याचं नाव आणि ज्यांनी हे घडवलं आमचे शिवराय त्यांचे नाव .छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवाजी.
आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपनार ही नाही माझ्या छत्रपतींच्या नावाचा दरारा.जय जिजाऊ जय शिवराय.
शिवराय दैवत आमचे मुखी दूसरे नाव नाही , लाज वाटते भगव्याची ज्याला ती हिंदूची औलाद नाही, भगवी आमची दादागिरी भगवी आमची आहे झडप, नाद कराल शिवशंभूभक्तांचा तर करू आम्ही दुनियेतून गडप , कल भी कहा था आज भी सुनलो सारे , साऱ्या जगाचा राजा शिवराय माझा.जय जिजाऊ जय शिवराय.
देवांना दह्यादुधाचा अभिषेक करुन राजसत्तेसाठी लढणारे खूपजण पाहिले पण रक्ताभिषेक करुन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे एकच राजे शिवछत्रपती शिवराय माझे.जय जिजाऊ जय शिवराय.
जरी प्रत्येक मावळ्यांच्या हातात तलवार असली तरी उत्तम नेतृत्व आणि प्रबळ इच्छाशक्ती हीच स्वराज्य स्थापित करू शकते .जय जिजाऊ जय शिवराय .
शिवराय तुम्ही येणार म्हणून सजली ही सारी धरती, तुमचे शौर्य पाहुन पोहचली साऱ्या जगभर किर्ती, चाहूल लागली तुमच्या आगमनाची, पायधूळ होऊ तुमच्या चरणाची , एवढीच इच्छा ह्या शिवभक्तांची .जय जिजाऊ जय शिवराय.
शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची महान किर्ती , वीर राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा राजा शिवछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय.
समोर कितीही प्रबळ संकट असलं तरी त्या संकटाच्या, डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त, लढायचं आणि जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत, माघार घ्यायची नाही.जय जिजाऊ जय शिवराय.
समुद्राचे पाणी कधी आटणार नाही हिंदवी स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय, लाखो जन्म झाले तरी नाद शिवरायांचा कधीही सुटणार नाही. जय भवानी जय शिवाजी.
वीर महारथी जन्मले या भुमीवरी , आमच्या काळजात दिसेल फक्त छत्रपतींची शिवमुर्ती , नसानसात दौडतो शिवशंभू छावा, मान झुकते आठवून तुमची किर्ती.जय जिजाऊ जय शिवराय
मित्र जोडावेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने संपूर्ण जग जिंकता येईल आणि मैत्री टिकवावी छत्रपती शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
संकटाशी अशा प्रकारे झुंजायचं की जिंकलो तरी इतिहासच आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय.
सह्याद्रीच्या कडेकपारी वरी घुमतो वारा तुझ्या नावाचा, कृष्णा गोदावरी भीमा कावेरी,घागर भरती तुमच्या कृपेच्या. जय जिजाऊ जय शिवराय.
गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की राजा शिवछत्रपतींचा शिवभक्त म्हणुन जगायचा सन्मान मिळतोय कारण यापेक्षा श्रेष्ठ या जगात माझ्यासाठी काहीच नाही.जय जिजाऊ जय शिवराय.
मुखात जगदंब नामश्रेष्ठ आहे ,मनात शिवरायांचे तेजस्वी शिवविचार आहेत, अंगात शिवशंभूचा रंग आहे,म्हणून गर्वाने सांगतो,मी शिवरायांचा शिवभक्त आहे.जय जिजाऊ जय शिवराय.
यश मिळवण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास पाहिजे आणि प्रबळ आत्मविश्वास मिळवण्यासाठी राजा शिवछञपतींचा इतिहास माहिती पाहिजे.जय जिजाऊ जय शिवराय.
आन आहे या मातीची शिवरायांना विसरेल ज्या दिवशी त्याच दिवशी माती होईल या शरीराची ती माती सुद्धा सांगेल ही आहे एका शिवभक्ताची जय जिजाऊ जय शिवराय.
सत्याची ढाल होती, निष्ठेची तलवार होती वीरतेचा, भाला होता,हर हर महादेव नारा होता,साथ सह्याद्रीची होती,जिजाऊंचा आशिर्वाद होता ,मरणाची भीती नव्हती,स्वराज्य हाच ध्यास होता .जय जिजाऊ जय शिवराय.
अंगात हवी रग रक्तात हवी आग छाती आपोआप फुगते एकदाजय जिजाऊ जय शिवराय बोलून तर बघ.जय जिजाऊ जय शिवराय.
शिवरायांशिवाय आयुष्यात काहीच नसावं माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त राजा शिवछत्रपती नाव असावं.जय जिजाऊ जय शिवराय.
नजऱ तुमची झलक आमची ,वंदन करतो शिवरायांना,हात जोड़तो जिजाऊ मातेला,प्रार्थना करतो आई तुळजाभवानीला,सुखी ठेव नेहमी शिवविचारांवर चालणाऱ्या माझ्या शिवशंभूभक्तानां.जय जिजाऊ जय शिवराय.
वीटेवरून उतरून पांडुरंगा मला एकदा पंढरी दाखव ,हवं तर मी येतो पण आमच्या शिवरायांना तु परत पाठव.जय जिजाऊ जय शिवराय.
सह्याद्रीच्या छाताडातून नाद जय भवानी गाजे,काळजात राहती आमच्या ,रक्तात वाहती राजे,आग ओकतो तुफ़ान गर्जतो वाघ मावळा माझा ,सन्मान राखतो जीव झोकतो वीर मातीचा राजा.जय जिजाऊ जय शिवराय.
पाण्यात गेल्यावर मगरांशी जंगलात गेल्यावर वाघाशी आणि हिंदवी स्वराज्यात आल्यावर शिवशंभूभक्तांशी कधीचं नडू नका.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
नको कसला फुकटचा माज नको आपल्याला डोक्यावर ताज आपली बस एकच इच्छा आहे शेवटच्या श्वासापर्यंत कानावर जय जिजाऊ जय शिवराय हा आवाज पाहिजे.जय जिजाऊ जय शिवराय.
भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभीमानाची आग आहे ,घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवरायांचा ढाण्या वाघ आहे,ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा शिवशंभुचे आम्ही भक्त,जय जिजाऊ जय शिवराय.
प्रत्येक मावळा वेडा आहे भगव्याचा,हिंदवी स्वराज्याचा आणि शिवरायांचा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
हो वेड लागले मला आई जिजाऊच्या संस्काराचं शिवरायांच्या तलवारीचं संभाजीराजेंच्या शौर्याचं अन बलिदानाचं छत्रपतींच्या इतिहासाचं महाराष्ट्राच्या मातीचं.जय जिजाऊ जय शिवराय.
ना चिंता कशाची ना भिती ज्यांच्या मनामनामध्ये राजे शिवछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय.
वर्तमानकाळाच्या छाताडावर पाय रोवून भूतकाळ उलटा टांगून,भविष्य घडवायला शिकवणाऱ्या पवित्र मातीतल्या शिवरायांना,रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून त्रिवार मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय.
धन्य आहे तो हर मावळा जो स्वराज्यासाठी लढला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
पराक्रम बघून तोंडात बोटं घालणारे खुप असतात पण शत्रूच्या छावणीत घुसून त्याची बोटे कापणारे फक्त वीर शिवरायांच असतात.जय जिजाऊ जय शिवराय.
आई तुळजाभवानीचे आम्ही भक्त,अंगात सळसळत मराठी रक्त,जीवन जगताना राहा ताठ, हीच मावळ्याची जात, शिवरायांचा आठवावे स्वरूप, शिवरायांचा आठवावा प्रताप,या माझ्या राजाला शत कोटी प्रणाम.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
कलम नव्हते नव्हता कायदाही,तरीही प्रजा होती सुखी,कारण सिंहासनावर होता,माझा राजा शिवछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय.
नुसतं वादळ नाही त्सुनामीचा कहर आहे शिवशंभूचा भक्त म्हणजे फक्त आग नाही तर भडकलेला वनवा आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जिथे शिवरायांचा घाम पडला, जिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त सांडले, जिथे शूर सरदारांच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या तो मुलुख हिंदवी स्वराज्याचा भाग झाला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
श्रीमान रायगडी मंदिरी वसे माझा राजा, चरणाशी अर्पितो आजन्म ही काया,जगदीश्वराच्या चरणाशी जोडली ज्यांची ख्याती,प्रथम वंदितो मी तुम्हा राजा शिवछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय.
असा एकच छत्रपती मिळाला आहे या हिंदवी स्वराज्याच्या मातीला मावळा म्हणून संबोधले त्यांनी अठरा पगड जातींना .जय जिजाऊ जय शिवराय.
इतिहासाच्या पानापानावर ज्याने नाव आपले कोरले, जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगविले,भगवा पताका हाती घेवूनी खिंड त्याने लढ़वली,आपले संपूर्ण जीवन अर्पण करून त्याने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
वाहिलेल्या रक्तातून सुद्धा दिसणार नाही काळोख शिवशंभूभक्त आहोत आम्ही हिच आमुची ओळख .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
वारे वेगाने नव्हते तर वाऱ्यापेक्षाही त्याचा वेग जास्त होता, अन्याया विरुध्य लढण्याचा त्याचा खंबीर इरादा नेक होता,असा आई जिजाऊचा लेक ,राजा शिवछत्रपती लाखात नाही तर संपूर्ण जगात एकच होता.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
छत्रपतींच्या कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र,छत्रपतींच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने,छत्रपतींच्या इतिहास पाहून गर्वाने फुलते आमची छाती,देव माझा राजा शिवछत्रपती माझा मुजरा फक्त शिवचरणी,शिखरावरती कळस अंगणामध्ये तुळस ,हिच तर आहे संपूर्ण महाराष्ट्राची ओळख.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
या शरीरास नाही आता कुणाचीच भीती सांगतो आता छाती ठोकुन आदर्श आमचे राजा शिवछञपती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
तेलाशिवाय किंमत काय समईतल्या वातीला, पाण्याशिवाय किंमत काय या सुपीक मातीला,धारेशिवाय किंमत काय तलवारीच्या पातीला, राजा शिवछत्रपतींशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ना चिंता कशाची ना भिती ज्यांच्या मनात राजे शिवछत्रपतींची नीती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जिथे शिवशंभूभक्त उभे राहतात,तिथे पडते बंद भल्या भल्याची मती, अरे मरणाची कुणाला भीती,पाठीशी आमच्या आमचे राजे शिव छत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसरीच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि असा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा करत नाही .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सांग साऱ्या जगाला ओरडुनी मी मावळा आहे शिवरायांचा माय मराठीचा लेक मी आशीर्वाद आईसाहेब जिजाऊंचा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सह्याद्रीच्या काळ्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज घुमतो , तो म्हणजे छत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
बांधून घे गाठ काळजाशी अशी सुटणार नाही जी,आग आहे ही इतिहासाची विझणार नाही जी,धगधगता प्राण मी स्वराज्याचा मरणार नाही,किर्तीला शिवछत्रपतींच्या शब्द माझे पुरणार नाही.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ज्यांचे नाव घेता सळसळते आमच्या धमन्यांतील रक्त अशा शिवशंभुचे आम्ही भक्त.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
पावन मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली, वार्याची कोवळी झुळूक दऱ्याखोऱ्यात दरवळली,आई जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखरे ही किलबिलली, नगारा वाजला ,वारा डोंगराआड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सिंहाची चाल गरुडाची नजर ,स्त्रियांचा आदर शत्रूचे पतन,असावे असेच शिवशंभूभक्तांचे वर्तन,ही शिवछत्रपती महाराजांची शिकवण.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
समुद्रकिनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावंच लागते, पाण्याची किंमत कळण्यासाठी दुष्काळातही फिरावंच लागते आणि राजा शिवछत्रपतींचे लाख मोलाचे स्वराज्य कळण्यासाठी मराठीच असावे लागते.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
मुघलांनी त्याच्या बायकोंच्या इच्छा पुर्ण केल्या आणि ताजमहल बांधला,माझ्या राजानं आईसाहेबांच्या इच्छा पुर्ण केली अन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सळसळत रक्त शिवशंभू भक्त आणि कपाळी आमच्या भगवा टिळा,अरे आले शिवशंभू वादळ अन कोण अडविल या वादळा,आलाच आडवा कोणी तर त्याचा आम्ही वाजवू खुळखुळा,करायचा नाही नाद आमचा नादच खुळा,ठोकून छाती सांगतो जगाला मावळा शिवछत्रपतींचा .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
कार्यअसे शिवशंभुचे नाही कुणाला जमायाचे म्हणुनी नाव घेता त्यांचे मस्तक आमुचे नमायाचे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला मला माहित नाही पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला हिंदवी स्वराज्य देऊन गेला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
चार शतक होत आली,तरी नसानसांत शिवराय ,आले गेले कितीही,तरी मनामनात शिवराय,स्वराज्य म्हणजे शिवराय,स्वाभिमान म्हणजे शिवराय,शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
आम्हाला काय गरज सांगण्याची कि आम्ही किती कट्टर शिवशंभूभक्त आहोत कारण जिथे आम्ही जातो तिथे लोक आम्हाला आमच्या नावापेक्षा कमी अन कट्टर शिवशंभूभक्त म्हणुनच जास्त ओळखतात.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्याना कुणाची, चिंता नव्हती त्याना परिणामांची, कारण त्याना साथ होती आई भवानीची आणि आईसाहेब जिजाऊची त्यांची जात वीर मराठ्याची,देशात लाट आणली पराक्रमी भगव्याची,आणि मुहर्तमेढ रोवली हिंदवी स्वराज्याची म्हणूनच म्हणतात. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
देवा जर दिलास जन्म पुन्हा एकदा तर ,एक सुंदर फूल म्हणून जन्माला येऊ दे ,आणि त्या फूलाची जागा माझ्या शिवरायांच्या पायाशीच असू दे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
विठ्ठल आपला बाप रुक्मिणी आपली माय आणि राजा शिवछत्रपती महाराज आपले दैवत.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
मरण जरी आले तरी चालेल पण शरण जाणार नाही.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
आमचे महाराज माणसामधले देवच आहेत हे काही सिध्द करायची गरज नाही,इतिहास आहे साक्षीला दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो,शिवशंभूमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या थोर किर्तीला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जेव्हा माझ्या देहात रक्ताचा शेवटचा थेबं जरी शिल्लक असेल तरी सुध्दा मी फक्त एकचं नाम बोलेन राजा शिवछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जगणारे ते मावळे होते,जगवणारे ते स्वराज्य होते ,पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून,जनतेकडून मायेने हात फिरवणारे ,फक्त माझे राजा शिवछत्रपती होते ,शिवराय हे फक्त नाव नव्हे तर आमच्या जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
आई बहिणींची इज्जत करा काय फरक पडतो ती आपली आहे की इतरकुणाची हीच आपल्या छत्रपती शिवशंभूंची शिकवण आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
पहिला दिवा त्या देवाला ज्यांच्यामुळे देव्हाऱ्यात देव आहे,रयतेच्या मनावर अन इतिहासाच्या पानावर,मातीच्या कणांवर अन विश्वासाच्या,प्रमाणावर राज्य करणारा एकच राजे म्हणजे राजा शिवछत्रपती याना त्रिवार मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
वाघाच कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही आणि शिवशंभूभक्तांचा नाद केल्यावर अंगावरचं कातडं पण राहात,नाही चुकला तर वाट दाखवतो पण भुंकला तर वाट लावतो. आम्ही फक्त आणि फक्त शिवभक्त.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
इतिहास घडवुन गेलात तुम्ही ,भविष्यात तुमची किर्ती संपूर्ण जगात गाजेल, विश्व जरी संपले तरी छत्रपती तुमची शान राहील.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जातीपेक्षा ह्या स्वराज्याच्या मातीला आणि मातीपेक्षा राजा शिवछत्रपतींना मानतो आम्ही.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
तुमचे उपकार जेवढे मानावे तेवढे कमीच आहेत राजे ,तुम्ही व तुमचे असे शूरवीर मावळे होते म्हणुनच आज आम्ही आहोत .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
मृत्यू आला जरी तरी तो ऐटित असावा फक्त इच्छा एकच पुढच्या सर्वच जन्मी सुद्धा आपले दैवत राजा शिवछत्रपती महाराज हेच असावे .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
निधड्या छातीचा कणखर कणांचा,मराठी मनांचा भारतभूमीचा एकच छत्रपती ,छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
आईने बोट धरून चालायला शिकवले तर वडिलांनी बोलायच कसं शिकवले आणि शिवाजी महाराजांनी संकटाशी लढायचे कसे ते शिकवले.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ज्या मातीत जन्मलो तीचा रंग काळा आहे असो सह्याद्री वा असो हिमालय छाती ठोकून सांगतो मी छत्रपती शिवशंभूचा मावळा आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
फक्त माथ्यावरचं नव्हे तर रक्ताच्या प्रत्येक थेंबात देखील भगवा नांदतो कारण आमच्या हृदयात तो जाणता राजा शिवशंभूछत्रपती नांदतो.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
शिवरायांशिवाय किंमत नाही ,शंभू शिवाय हिंमत नाही ,भगव्या शिवाय नमत नाही,राजा शिवछत्रपती सोडून कोणापुढे झुकत नाही .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
साथ भगव्याची कधी सोडनार नाही ,वचन भगव्याचे कधी मोडनार नाही,घेतला तो अखेरचा श्वास ,होईल हा काळही स्तब्ध,ना पर्वा शत्रूची ,ना असे पराभवाची खंत,आम्ही आहोत फक्त शिवशंभुचे भक्त.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
➤सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक [३००+] Inspirational Thoughts In Marathi | Motivational Thought In Marathi
मित्रांनो आज आम्ही या लेखामध्ये आपल्यासाठी जे Quotes On Shivaji Maharaj In Hindi घेऊन आलो आहोत ते आपल्याला कसे वाटले ते आम्हाला अवश्य कंमेंटद्वारे कळवा. Thought On Shivaji Maharaj हे जर आपल्याला आवडले असतील तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना जरूर share करा . आपल्याकडे जर Sambhaji Maharaj Quotes , Photos Of Sambhaji Maharaj असतील तर आम्हाला जरुर पाठवा आम्ही ते पोस्ट करू.येथे दिलेले सर्व Shivaji's Photo तुमच्यासाठी आणले आहेत.अशा आहे कि येथे दिलेले Shivaji Maharaj Best Photo आपल्याला आपले इच्छुक ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत करतील .तर मित्रांनो आपल्याला हे Quotes About Shivaji Maharaj कसे वाटले ते अवश्य सांगा . धन्यवाद.
Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
Post a Comment